इंग्रजीत ‘शेक्सपिअर डिक्शनरी’ आहे. त्यात त्याच्या समग्र वाङ्मयातील शब्दांचे अर्थ, उदाहरणे वगैरे दिलेली आहेत. मनात विचार आला, त्या धर्तीवर एखादा कोश का लिहू नये? आणि मला कालिदासाचे नाव सुचले…

मी मोठा संशोधक नाही की, कालिदासाचा किंवा इतर संस्कृत ग्रंथांचा विशेषतः साहित्याचा सखोल अभ्यास केलेला नाही. पण कालिदास वाङ्मय वाचताना काही विचार सुचले किंवा मनात प्रश्न उभे राहिले. त्यात खूप उणीवा असतील किंवा ते चुकीचेही असू शकतील, पण ते सारे ‘परिशिष्ट’ विभागांत समाविष्ट केले आहेत. त्यामुळे कुणाला संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली, तर ते माझे सद्भाग्य समजेन.......